माजी खा.संभाजीराव काकडे यांनी माझ्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली व लग्नगाठही जुळवली, आ.पाचपुते यांनी जागवल्या आठवणी
नगर: बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे आज पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी दु:ख व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली आहे. पाचपुते यांनी काकडे यांच्या आठवणींना उजाळा देत माझे राजकीय जीवन घडवण्यात काकडे यांचा सिंहाचा वाटा होता असं म्हटलय.इतकच नाही तर आपलं लग्नही त्यांनीच जुळवल होते असेही पाचपुते यांनी म्हटले आहे.

आ.बबनराव पाचपुते यांचे ट्विट

 मोठ्या दिलदार मनाचा माणूस माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

मला राजकीय जीवनात घडवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यापैकी माजी खासदार संभाजीराव काकडे सर्वात अग्रणी होते.
त्यांच्या आवाहनाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि माझ्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर १९८०, ८५, ९० या निवडणुकीतही त्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं. १९९० साली काँग्रेसमध्ये प्रवेश करताना त्यांचाच सल्ला घेतला होता.
आणखी एक महत्त्वाची बाब जी माझ्या वैयक्तीक आयुष्याशी निगडीत आहे, ती म्हणजे माझ्या लग्नाची. माझं आणि डॉ. प्रतिभाचं लग्न त्यांनीच जुळवून आणलं. त्यांच्या जाण्यानं माझं वैयक्तीकही नुकसान झालंय. त्यांना पुनःश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली ! आ. बबनराव पाचपुते, श्रीगोंदा-नगर विधानसभा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post