पोलिसाकडून दुसर्‍या पोलीसाच्या आईला अश्लील मेसेज, विनयभंगाचा गुन्हा दाखल

 पोलिसाकडून दुसर्‍या पोलीसाच्या आईला अश्लील मेसेज, विनयभंगाचा गुन्हा दाखलनगर: तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक रामदास जयराम सोनवणे (वय 32) याने दुसर्‍या पोलीसाच्या आईला अश्लील मेसेज टाकून, लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोनवणे विरुद्ध येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. सोनवणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सोनवणे हा तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असताना, दुसर्‍या पोलीस कर्मचार्‍याच्या आईला गेल्या पाच दिवसापासून टेक्स्ट मेसेज पाठवले. लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन तो त्यातून करायचा. विशेष म्हणजे संबंधित महिलाही या प्रकाराला वैतागून गेलेली होती. ही हकीगत महिलेने तिच्या मुलाला सांगितली.


संबंधित महिलेने याची कल्पना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना दिलेली होती. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी संबंधित महिलेला आलेले मेसेज तसेच फोन रेकॉर्डिंग या सर्व बाबींची शहानिशा केली. पाठवलेले मेसेजवर रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये सोनवणे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post