सराईत गुन्हेगाराकडून दोन तलवारी जप्त

 *सराईत गुन्हेगाराकडून दोन तलवारी जप्त*


श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कामगिरीनगर (विक्रम बनकर): श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, साईनगर वार्ड नं. २ श्रीरामपूर येथे कच्या रोडने एक इसम दोन्ही हातात दोन तलवारी घेवुन फिरत आहे. या वरुन पोलीस साईनगर वार्ड नं. २ श्रीरामपूर येथे कच्या रोडने जात असतांना समोरुन एक इसम दोन्ही हातात दोन तलवारी घेवून येतांना दिसला पोलीस त्याचे दिशेने जात असता तो पोलीसांना पाहुन पळुन जावु लागला त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले त्याला पंचासमक्ष त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव शहारुख अन्वर शेख,( वय २१ वर्ष, रा. शनि चौक, वार्ड नं. २, श्रीरामपूर) असे सांगीतले. त्यांनतर पंचासमक्ष सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात दोन लोंखडी तलवारी असे एकूण ११००/- रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी त्याचेकडून जप्त केले आहे. पोकॉ/ २५३१ महेंद्र मोहन पवार यांनी दिलेल्या खबर वरुन नमूद आरोपी विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


सदरची कामगिरी अहमदनगर पोलीस मनोज पाटील, श्रीरामपुर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती दिपाली काळे, श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधीकारी संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप, पोहेकॉ. जोसेफ साळवी, पोकॉ. किशोर जाधव, राहुल नरवडे, महेंद्र पवार, पंकज गोसावी, सुनिल दिघे, यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post