शालेय पाठ्यपुस्तकात अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या जीवनावरील धडा

 

शालेय पाठ्यपुस्तकात अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या जीवनावरील धडामुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत  याने वर्षभरापूर्वी त्यानं आत्महत्या केली.  रुपेरी पडद्यावर सोज्वळ भूमिका साकारणारा सुशांत वैयक्तिक आयुष्यातही तितकाच शांत आणि हुशार होता. अभिनयासोबतच अभ्यासही तो तितक्याच आवडीनं करायचा. अन् त्याचे हेच गुण विद्यार्थांना कळावे. त्यांना देखील आयुष्यात काहीतरी चांगलं करुन दाखवण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी सुशांतच्या आयुष्यावरील एक धडा शालेय पुस्तकात सामिल करण्यात आला आहे.

सुशांतची मैत्रीण स्मिता पारिख हिनं एका बंगाली शालेय पुस्तकाचा फोटो पोस्ट करुन ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली. या पोस्टद्वारे तिनं बंगाली शिक्षण मंडळाचे आभार मानले आहेत. “सुशांतकडून विद्यार्थांना खूप काही शिकता येईल. तो केवळ उत्तम अभिनेताच नव्हता तर आपल्या आई-वडिलांचा आदर करणारा एक आदर्श मुलगा देखील होता. अभिनयासाठी त्यानं शिक्षण सोडलं नाही किंबहूना शिक्षण देखील तितकच महत्वाच असतं याचं भान त्याला होतं. अन् त्याचे हे सर्व गुण विद्यार्थांना शिकता येतील” असा विश्वास तिनं या पोस्टद्वारे व्यक्त केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सुशांतच्या चाहत्यांनी या धड्यासाठी शिक्षण मंडळाचे आभार देखील मानले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post