प्रार्थना करणे गुन्हा असेल तर होय मी गुन्हेगार आहे !

 प्रार्थना करणे गुन्हा असेल तर होय मी गुन्हेगार आहे- सुजित झावरे पाटीलस्व. मा. आ. वसंतराव झावरे पाटील यांचे नावाने सहकारी मित्र व मी कोविड सेंटर सुरू केले, कोणतेही उद्घाटन , जाहिरात समारंभ करण्याचे कटाक्षाने टाळले कोणाचेही अनुकरण मी कधीही करीत नाही. सत्तेत नसलेने अनंत त्रासांना आम्ही निमुटपणे सामोरे गेलो.  प्रत्येक पेशंटची रोज आवर्जून चौकशी केली.  त्यांना नाष्टा, चहा, दोन वेळचे भोजन, दर्जेदार औषधे मोफत देण्या बरोबर त्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून मराठी भाषेतुन श्रीमद्  भगवद् गीता या अमूल्य ग्रंथाचे वाटप केले. अन्य आयुर्वेदिक पुस्तके भेट दिली. रुग्ण बरे होऊन जात असताना त्यांना एक झाड भेट दिले. 

काही धार्मिक विधी हा औषधोपचारासोबत केल्यास अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालण्याचा एक छोटासा प्रयोग केला. रोज कीर्तन, प्रवचन कधी डॉक्टरांचे समुपदेशन हे सर्व कार्यक्रम नित्य नियमाने चालु आहेत. अनेक सहकाऱ्यांनी यात जीव ओतून अतोनात कष्ट घेतले कोणी द्रव्यदान केले, कोणी धान्यदान केले तर कोणी वैद्यकीय औषधे व साहित्य मोफत दिले. त्यांचे आम्ही ऋणी आहोत.

दि. २०/५/२०२१ रोजी या कोविड सेंटर पासून बराचश्या अंतरावर मोकळ्या जागेत विश्वशांती यज्ञ संपन्न झाला. या मागचा हेतू एवढाच होता कि जिथे मनुष्य हतबल होतो तेथे तो ' परमेश्वराला साकडे घालतो यज्ञ, होम हवन हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. गीता, ब्रह्मपुराण, विष्णू पुराण यात याचे असंख्य दाखले आहेत. 

थोडक्यात अग्नी प्रज्वलित करून त्याद्वारे ईश्वरास तसेच वैश्विक शक्तीस प्रार्थना पूर्वक आवाहन करणे. म्हणजे यज्ञ. यात वनऔषधीसह गायीचे तूप, गोवऱ्या, अनेक आयुर्वेदातील वस्तूचे हवन केले जाते. एक चमचा गायीचे तूप व गोवरी अग्निस टाकल्यास त्यातून ऑक्सिजन निर्माण होतो हे विज्ञानाने देखील सिद्ध केलंय.  "श्रीमद्  भगवद्  गीतेतील ३ अध्याय १० व ११ श्लोक. इच्छित मनोकामना सिद्धीसाठी प्रसन्न चित्ताने, श्रद्धेने यज्ञ केल्यास तो प्रजेसाठी उपयुक्त ठरतो. राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान द्वारे केले गेलेल्या एका रिसर्च मध्ये असे सिद्ध झालंय की होम-हवन, पूजा पाठ यावेळी उत्पन्न होणाऱ्या औषधीय धुराने हानिकारक जिवाणू नष्ट होतात. 

हवन किंवा यज्ञ ही भारतीय परंपरेनुसार शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आहे. यात तूप, मध, बेल, पिंपळ, खैर, शमी, दूर्वा, मदार, पलाश, वड व अन्य अनेक औषधी वनस्पती असतात.

प्रत्येक ऋतू मध्ये आकाशात भिन्न भिन्न प्रकारचे वायुमंडले असतात. कधी वायूमंडले स्वास्थ्यवर्धक असतात तर कधी अस्वास्थ्यवर्धक असतात. या विकृतींना दूर करणेसाठी यज्ञ हवन केले जाते व प्रसन्न वातावरण निर्माण होते.

 यात अंधश्रद्धेचा प्रश्न येतो कुठे, ज्यांना मनात श्रद्धाच नाही त्यांना असले उदयोग सवंग लोकप्रियतेसाठी सुचतात.

ज्यावेळी एखादा रुग्ण आजारी असला की आपण प्रार्थना करतो की देवा त्याला लवकर बरे करा, प्रार्थनेत खूप शक्ती असते मग त्यालाही ही मंडळी अंधश्रद्धा म्हणणार काय? शेवटी डॉक्टरांचे सर्व प्रयत्न संपल्यावर तेही म्हणतात आता परमेश्वरच त्याला वाचवू शकतो. आता बोला? 

तुम्हाला नाचगाणे, कोविड सेंटरमध्ये चालतात, भोंदू बाबा चारण करायला लावतात ते चालते ही खरी अंधश्रद्धा आहे. पण मीडिया जसे दाखविल तसे पाहण्याची आपली बुद्धी झाली आहे. यात त्यांचा काय दोष.

मी परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवतो, ठेवणार याच्यात कोणाची काय मत आहे ते जाणून घेण्याची मला आवश्यकता नाही काही वर्षांनी तेही हे अनुकरण करतील जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते.

" राम कृष्ण हरी "

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post