राज्यात करोनाला ब्रेक.... दैनंदिन रुग्णवाढ घटली

 

राज्यात करोनाला ब्रेक.... दैनंदिन रुग्णवाढ घटलीमुंबई: राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागला असून गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आहे. तसेच दररोज होणाऱ्या मृत्यूंमध्ये देखील घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २६ हजार ६१६ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ३४ हजार ३८९ इतकी होती. कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून असून हा फरक ७ हजार ७७३ इतका आहे.


तर दुसरीकडे निदान होणाऱ्या नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. ही दिलासादायक बाब आहे. आज एकूण ४८ हजार २११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ५९ हजार ३१८ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील खाली घसरली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ४५ हजार ४९५ वर आली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post