राज्यात करोनाचा काढता पाय... सलग दुसऱ्या दिवशी मोठा दिलासा

 मुंबई: राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र रविवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी राज्यात 48,401 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यभरात  60,226 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात  572 कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 44,07,818 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.4 % एवढे झाले आहे. शनिवारी 82,266 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला होता तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले होते.


राज्यात रविवारी 572 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९४,३८,७९७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१,०१,७३७ (१७.३३टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.  सध्या राज्यात ३६,९६,८९६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,१५,७८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post