दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान

 दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नका

उच्च न्यायालयात याचिका दाखलमुंबई : दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नका अशी मागणी करत हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. अशात परीक्षा घेणं विद्यार्थ्यांसाठी व इतर कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक असू शकतं. मात्र राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देत निवृत्त प्राध्यापक आणि पुणे विद्यापीठाचे माजी सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post