श्रीगोंदा तालुक्यातही १० दिवसांचा जनता कर्फ्यु

 श्रीगोंदा तालुक्यातही १० दिवसांचा जनता कर्फ्युश्रीगोंदा- कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे श्रीगोंदा तालुक्यात 5 मे पासून 14 मे पर्यंत श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने स्वयं स्पूर्तीने जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली.

       राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या परिस्थिती श्रीगोंदा तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. गेल्या आठवडाभरात 1000 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढत आहेत.यामुळं प्रत्येक गावातील ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांच्या सोबत चर्चा केली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 10 दिवस जनता कर्फ्यु लागू करण्यासंदर्भात एकमताने चर्चा झाल्याने सर्व ग्रामपंचायतींनी जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेवून तसा ठराव केला. 
      प्रशासनाकडून जनता कर्फ्युसंदर्भातील गाईडलाईन्स जारी केल्या असून 5 मे पासून दहा दिवस जनता कर्फ्यू लागणार आहे. जनता कर्फ्यूच्या काळात 11 वाजेपर्यंत किराणा व भाजी विक्री साठीं होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात येणार आहे. तर अत्यावश्यक सेवा मध्ये समाविष्ट असलेले मेडिकल, हॉस्पिटल, दूध संकलन,पाणी,पेट्रोल पंप (अत्यावश्यक सेवा) इत्यादी गोष्टी सुरू राहणार आहेत.गाईडलाईन्स आज जारी केल्यातरी उद्यापासून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल. कोरोना विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी या गाईडलाईन्सचं पालन करुन तालुक्यातील जनतेने सहकार्य करावं, असं आवाहन, तहसीलदार प्रदीप पवार यांनी केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post