अर्थकारण.... दरमहा १५०० रुपये गुंतवणुकीतून मिळु शकतात ५० लाख

 

दरमहा १५०० रुपये गुंतवणुकीतून मिळु शकतात ५० लाखनवी दिल्ली: गुंतवणुकीसाठी बर्‍याच प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत, परंतु म्युच्युअल फंड जलद पैसे जमा करण्याचा एक चांगला मार्ग आहे. एसआयपीमार्फत गुंतवणूक केल्यास जोखीम देखील कमी आहे.  या फंडाद्वारे आपण आरामात आपल्या मुलांच्या लग्नाची आणि त्यांच्या शिक्षणाची सोय करू शकता. 

जर तुम्हाला 50 लाखांहून अधिक निधी जमा करायचा असेल तर तुम्हाला दरमहा फक्त 1500 रुपये जमा करावे लागतील. म्हणजे आपल्याला दररोज 50 रुपये वाचवावे लागतील. फ्रँकलिन टेम्पलटन ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर दिलेल्या कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्हाला त्यावर 12% रिटर्न मिळाला तर 30 वर्षांनंतर तुम्हाला जवळपास 53 लाख रुपये मिळतील. दुसरीकडे जर तुम्ही म्युच्युअल फंड योजनेत दरमहा 1000 रुपये गुंतवले तर 20 वर्षांनंतर तुमच्याकडे २० लाख रुपयांचा निधी तयार असेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post