सिद्धी फाउंडेशनच्यावतीने ३६५ दिवस प्लाझ्मा डोनेशन अभियान

 


सिद्धी फाउंडेशनच्यावतीने ३६५ दिवस प्लाझ्मा डोनेशन अभियान 
जितो, लायन्स क्लब, डायग्नोपिन व महावीर प्रतिष्ठानचे देखील सहकार्य 


पुणे : सध्या पुणे शहरात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अनेकांचे जीव जात आहेत.पुणे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सर्वावर उपचार करण्यास कमी पडत आहे.त्यासाठीच पालिकेच्या यंत्रणेला मदत व्हावी व कोरोना रुग्ण बरे व्हावे यासाठी अनेक स्वयसेवी संस्था पुढे येत आहेत.कोरोना वरील औषध नसल्यामुळे विवीध उपाय योजना करून कोरोना बाधीताचे प्राण वाचवले जात आहेत. यामध्ये प्लाझ्मा देऊन देखील अनेकांचे प्राण वाचवण्यामध्ये आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.म्हणूनच सिद्धी फौंउडेशनच्या वतीने पुढील १ वर्ष प्लाझ्मा डोनेशन अभियान राबवण्यात येणार आहे.यामध्ये जितो पुणे, लायन्स क्लब गणेशखिंड, डायग्नोपिन व महावीर प्रतिष्ठान यांचे देखील सहकार्य असणार आहे.या अभियानाची सुरुवात सिद्धी ग्रुपचे लोकेश शिंगवी यांनी स्वतः प्लाझ्मा दान करून केली.मागील १४ वर्षापासून २१ मे ला सिद्धी फौंडेशन भव्य रक्तदान शिबीर आयोजित करून पुणे शहराला शेकडो बाटल्या रक्त जमा देतात. उन्हाळ्यामध्ये रक्ताचा तुटवडा असतो. या शिबीरामुळे तो तुटवडा मोठ्या प्रमाणावर भरून निघण्यास मदत होते. हजारो नागरिक या शिबिरात रक्तदानासाठी येत असतात. याचा डेटा सिद्धी फौंडेशन मागील अनेक वर्षापासून गोळा करत आहे व वर्षभर कोणालाही रक्त लागले तर ते या माध्यमातून रक्त पुरवत असतात. यावर्षी सिद्धी फौंउडेशन रक्तदाना सोबत प्लाझ्मा दान देखील करणार आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण यामुळे वाचविण्यास आरोग्य यंत्रणेला मदत होईल. यासाठी नीरज कांकरीया, जिनुभाई लोढा, योगेंद्र चोरडिया, योगेश मोहोळ, उमेश पाथरकर, सुरेन्द्र बेदमुथा, सिद्धांत छाजेड, जितो पुणे युथ विंगचे गौरव नहार, प्रीतेश मुनोत, गौरव बांठिया, नीलेश दर्डा, कौशभ धोका हे प्रयत्नशील आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------

अशा प्रकारे होणार प्लाझ्मा दान अभियान
* सिद्धी छाजेड व त्यांचा ग्रुप ज्यांना कोरोना होऊन गेला आहे. यांचा डाटा गोळा करून त्या व्यक्तींना प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी प्रोस्ताहीत करणार.
* लोकेश जैन, रोहन शेळके, डॉ. सिद्धेश भोंडे व त्यांचे सहकारी हे जे व्यक्ती प्लाझ्मा देण्यासाठी तयार झाले आहेत त्यांच्या अँटी बॉडीज टेस्ट करून घेणार. जे व्यक्ती यामध्ये प्लाझ्मा देऊ शकतात त्यांना आय. एस. आय. ब्लड बँक नवी पेठ व पी. एस. आय. ब्लड बँक रास्ता पेठ या ठिकाणी प्लाझ्मा डोनेट करून घेणार. प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीची वेळ व इतर सर्व गोष्टीची जबाबदारी हा ग्रुप उचलेल त्यामुळे डोनरला कसलाही त्रास होणार नाही.
* अमित संघवी व मुकेश संघवी व त्यांची टीम हे ज्यांना प्लाझ्मा पाहिजे आहे त्यांना प्लाझ्मा कुठलीही अडचण न येऊ देता पोहचवतील.
* हा प्लाझ्मा कोणाला दिला गेला याचा डेटा सिद्धी छाजेड व त्यांच्या सहकार्याकडे जाईल व ही टीम ज्यांना प्लाझ्मा दिला आहे. ती व्यक्ती ठीक झाल्यावर इतरांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना प्लाझ्मा देण्यासाठी पुन्हा प्रोस्ताहीत करतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post