मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगर जिल्ह्यात 4200 बेडच्या जंम्बो कोविड सेंटरला दिली परवानगी

 

साईंच्या शिर्डीत साकारणार 4200 बेडचे जंम्बो कोविड सेंटर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली मंजुरीशिर्डी : राज्यात कोरोना संसर्ग वाढतोय. सर्वच क्षेत्रातील संस्था रुग्णसेवेसाठी पुढाकार घेत आहेत. त्यात राज्यातील सर्वात श्रीमंत अशा शिर्डीचे साईबाबा संस्थाननेही पाऊल उचललं आहे. संस्थानच्या साई आश्रममध्ये तब्बल ४२०० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.


शिर्डीच्या साईबाबा संस्थानाने अहमदनगर जिल्ह्यासाठी दिलासादायक माहिती दिली आहे.  साईबाबा संस्थानाच्या वतीने तब्बल ४२०० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याची घोषणा केली आहे.

या कोविड सेंटरमध्ये ४२००बेड,  १००० ऑक्सिजन, २८० आयसीयु बेड असणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि विधि कार्यालयाकडून शिर्डीत जम्बो कोविड सेंटर उभारण्याची परवानगी मिळाली आहे.

या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना मोफत उपचार देण्यात येणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post