शेवगाव शहर व तालुक्यात ७ दिवस कडक लॉकडाऊन, किराणा, भाजीपाला विक्री बंद

 

शेवगाव शहर व तालुक्यात कडक लॉकडाऊन, किराणा, भाजीपाला विक्री बंदनगर: शेवगाव शहर व व तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेवगावमध्ये सात दिवसाचा जनता कर्फ्यू केला असल्याची घोषणा तहसीलदार अर्चना भाकड -पागिरे यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शेवगाव शहर तालुक्यातील नागरिकांना कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासन प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली व त्यानुसार दिनांक ११ मे ते १७ मे पर्यंत सात दिवसाचा जनता कर्फ्यू हा जाहीर केला असल्याची माहिती शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड- पागिरे यांनी दिली आहे. यादरम्यान फक्त दवाखाने, सर्व मेडिकल दुकाने हे चालू राहतील. तसेच दूध संकलन केंद्र सकाळी सात ते नऊ या वेळेत होणार आहे.पेट्रोल व डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच सुरू राहतील.तसेच भाजीपाला, फळे किराणा माल विक्री व इतर सर्व प्रकारची दुकाने पूर्णपणे बंद राहतील.त्यामुळे शेवगाव तालुक्यातील शहरातील नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती शेवगावच्या तहसिलदार अर्चना भाकड- पागिरे यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post