राष्ट्रसंत सेनाजी महाराज जयंती घरीच साजरी करा

 राष्ट्रसंत सेनाजी महाराज जयंती घरीच साजरी करा  

नाभिक सेवा संघाचे संपर्क प्रमुख हर्षद शिर्केेेेे यांंचेे आवहन
नगर:  नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेना महाराज यांची 721वी जयंती 8 मे रोजी असून यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे व शासनाच्या आदेशामुळे साध्या पध्दतीने घरीच साजरी करण्याचे आवाहन नाभिक सेवा संघाचे नगर जिल्हा संपर्क प्रमुख  हर्षद विनायक शिर्के पाटील यांनी केले आहे.                                     राष्ट्रसंत सेनाजी महाराज जयंती निमित्त दरवर्षी त्यांचे जन्मस्थळ बांधवगड ( मध्यप्रदेश ) येथे महाराष्ट्रासह विविध राज्यांतून बांधव जात असतात.  परंतु मागील वर्षीपासून देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व शासनाच्या आदेशामुळे यावर्षी बांधवगड येथे जाता येणार नाही.  8 मे रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन संत साहित्याचे वाचन व मनन करावे.शक्य झाल्यास शासनाच्या आदेशाचे पालन करुन गोरगरीबांना धान्य वाटप करा , तसेच मुक्या प्राण्यांना चारा व पाणी द्यावे.तसेच कोरोना काळात आपले कर्तव्य बजावनारे पोलिस , डॉक्टर , नर्स , रूग्णवाहीका व सफाई कर्मचारी यांच्या दिर्घायुष्यासाठी राष्ट्रसंत सेनाजी महाराज चरणी प्रार्थना करावी असे आवाहन  करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post