'एसबीआय'कडून अलर्ट....'या' वेळेत बॅंकेची ऑनलाईन सेवा बंद राहणार

 'एसबीआय'कडून अलर्ट....'या' वेळेत बॅंकेची ऑनलाईन सेवा बंद राहणारनवी दिल्लीः  सध्या जवळजवळ प्रत्येक बँकेचे ग्राहक यूपीआय पेमेंटचा वापर करतात. अशा परिस्थितीत ही सेवा बंद झाल्यास व्यवहारात अडचणी येण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने दुरुस्तीसाठी काही काळ आपली सेवा बंद करण्याची घोषणा केलीय. 

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. बँकेचे म्हणणे आहे की, ग्राहकांना अधिकाधिक चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 7 मे रोजी दुपारी 12: 15 वाजता आणि 8 मे रोजी सकाळी 1:45 वाजता बँकेच्या ऑनलाईन सेवेत दुरुस्ती केली जाणार असून, त्यासाठी बंद राहणार आहे. बँकेने म्हटले आहे की, यावेळी एसबीआय ग्राहकांना INB/YONO/YONO Lite/UPI सेवा वापरता येणार नाही.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post