स्टेट बँकेकडून गृह कर्जावरील व्याजदरात कपात

 

स्टेट बँकेकडून गृह कर्जावरील व्याजदरात कपातमुंबई: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियानं गृह कर्जावरील व्याज दरात कपात केली आहे.अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत होम लोन म्हणजेच गृहकर्जाचं व्याज कमी करण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतलाय. 1 एप्रिलला स्टेट बँकेने गृह कर्जावरील व्याजदर 6.70 टक्के वरुन 6.95 टक्के इतका केला होता. मात्र, आता एसबीआयनं व्याज दर घटवला आहे. 

30 लाखापर्यंतच्या गृहकर्जासाठी 6.70 टक्के व्याज

एसबीआयनं त्यांच्या ग्राहकांसाठी 30 लाखापर्यंतच्या गृह कर्जासाठी 6.70 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. 30 लाख ते 75 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 6.95 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. तर, त्यापुढील रकमेसाठी 7.05 टक्के व्याज दर असेल

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post