२० हजारांची लाच...महिला सरपंचाचा पती 'एसीबी'च्या जाळ्यात

घरकुल योजनेची रक्कम देण्यासाठी 20 हजारांची लाच, महिला सरपंचाचा पती 'एसीबी'च्या जाळ्यात जालना- जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील काजळा येथील पंतप्रधान आवास घरकूल योजनेतंर्गत मंजूर झालेली रक्कम लाभार्थीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सरपंच पतीला 20 हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रंगनाथ सुभाष देवकाते असे आरोपीचे नाव आहे.

बदनापूर तालुक्यातील काजळा येथील तक्रारदाराला पंतप्रधान आवास घरकुल योजनेतंर्गत 1 लाख 20 हजार रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी 15 हजारांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेली होती. त्यानंतर दुसरा हप्ता 45 हजार रुपये लाभार्थीच्या खात्यावर टाकण्यासाठी काजळा गावच्या महिला सरंपचाचे पती तथा ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ सुभाष देवकाते (वय – 20) यांनी 30 हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने थेटलाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post