सारोळा कासारला आरोग्याचा 'महामंत्र', नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांकडुन मोफत आरोग्य तपासणी

 

सारोळा कासारला आरोग्याचा 'महामंत्र', नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांकडुन  मोफत आरोग्य तपासणीनगर : जय शंकर मित्र मंडळ आणि ग्रामपंचायत यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने व सद्गुरू श्री. राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ. आरती रविंद्र कडूस यांनी सारोळा कासार येथे काल दि. ९ मे रोजी संपूर्ण मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. 

         नगर येथील सुप्रसिद्ध हृदयरोग आणि मधुमेह तज्ज्ञ डॉ. सचिन बुधवंत, डॉ. गहिनीनाथ खेडकर, डॉ. गणेश बढे यांनी ह्यावेळी मोफत नागरिकांची तपासणी करून औषधे दिली त्याचप्रमाणे ज्यांना गरज असेल त्यांना इतर तपासण्या करून घेण्याचा सल्ला दिला. रक्तदाब, रक्तातील साखर, ECG यासारख्या तपासण्या करून तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी खाजगी दवाखान्यात साधारण २००० ते ३००० रु. खर्च येतो तसेच शहरात येणे जाणेही सध्या लॉकडाऊन मुळे शक्य होत नाही. शिबिरावेळी सुमारे १०० मध्यमवयीन आणि वृद्ध नागरिकांच्या वरील सर्व तपासण्या एक रुपयाही न घेता करण्यात आल्या. सुमारे ४०% मध्यमवयीन आणि वृद्ध नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग इ. सारखे आजार आहेत. ग्रामीण भागातील बऱ्याच नागरिकांना आपल्याला असा कुठला आजार आहे ह्याची कल्पनाच नसते. सध्याच्या कोरोनाकाळात अश्या नागरिकांना धोका अधिक आहे. अश्या नागरिकांना वेळीच औषधोपचार सुरू व्हावा व त्यांचा कोरोनाचा धोका कमी व्हावा हा या शिबिरामागील मुख्य उद्देश होता असे यावेळी बोलताना सरपंच सौ. आरती कडूस यांनी सांगितले. यासाठी स्थानिक सुप्रसिद्ध डॉ. अतुल संचेती , डॉ. राहुल ठोकळ व आरोग्यसेविका वर्ष काळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

         शिबिरानंतर सारोळा येथे ग्रामपंचायत व जय शंकर मित्र मंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या आणि संपूर्ण मोफत असलेल्या 'गुरू शंकर क्वारंटाईन सेंटर' ला डॉ. बुधवंत, डॉ. खेडकर व डॉ. बडे यांनी भेट देऊन प्रत्येक रूग्णाची तपासणी केली. सेंटर मध्ये पुरविण्यात येत असलेल्या सुविधा आणि येथील व्यवस्था पाहून त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले तसेच एका गरीब गरजवंत वृद्धेला आपल्या खाजगी दवाखान्यात दाखल करून तिला मोफत औषधोपचार देण्याची इच्छा व्यक्त केली.

         शिबिर व्यवस्थापन, भवन सॅनिटायझेशन साठी नाना पारधे, बाळासाहेब गट, महेश कडूस,  जीवन हारदे, भूषण कडूस, ऐश्वर्य मैड, नितीन साळवे, शुभम धामोरे, महंमद तांबोळी, आसिफ शेख, बब्बू इनामदार, संजय राहिंज, स्वामी धामणे, नंदू कडूस, विजय राहिंज यांनी विशेष प्रयत्न केले. अतिशय व्यस्त कार्यक्रमातून सर्व डॉक्टरांनी शिबिरासाठी भरपूर वेळ देऊन विनाशुल्क रुग्णसेवा केली याबद्दल पंचायत समिती सदस्य श्री. रविंद्र कडूस यांनी त्यांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post