लॉकडाऊनची अंमलबजावणी करणार्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, संगमनेर शहरातील घटना

 लॉकडाऊनची अंमलबजावणी करणार्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, संगमनेर शहरातील घटनानगर: करोनाचा कहर रोखण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोलिस रस्त्यावर थांबून लॉकडाऊनवी अंमलबजावणी करत आहेत.

 मात्र नागरिक या फ्रंटलाइन वर्कर्सवर हल्ला करण्यास देखील मागेपुढे पाहत नाही आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात  यांच्या संगमनेर शहरातून  अशीच एक घटना समोर आली आहे.सगमनेर याठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे काही काळासाठी शहरात तणावाचं वातावरण होतं. गर्दी का केली अशी विचारणा केल्यावर जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना केली आहे. काही तरुण पोलिसांचा पाठलाग करत असल्याचं समोर आलेल्या व्हिडीओतून दिसत आहे. शिवाय या जमावाने सार्वजनिक ठिकाणी तोडफोड केल्याचंही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. यावेळी पोलिसाला मारहाण देखील करण्यात आली.. संगमनेर शहरात असणाऱ्या दिल्ली नाक्याजवळ ही घटना घडली आहे.

याठिकाणी पोलीस कर्मचारी लॉकडाऊन काळात लागू करण्यात आलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं याकरता गस्त घालत होते. त्यावेळी मारहाण आणि दगडफेकीची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जमावबंदीचे आदेश असताना गर्दी का केली, असा सवाल पोलिसांनी विचारला असता संतप्त जमावाने हल्ला केला. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणात सहा जणांसह अज्ञात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post