आघाडीचे राजकारण शिवसेनेसाठी तापदायक? 'या' माजी आमदाराने दिले भाजप प्रवेशाचे संकेत

 आघाडीचे राजकारण शिवसेनेसाठी तापदायक? 'या' माजी आमदाराने दिले भाजप प्रवेशाचे संकेतनांदेड : नांदेडमधील देगलूर मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे गेल्या महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोट निवडणुकीचे वेध अनेकांना लागले आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्वर्गीय अंतापूरकर यांच्या मुलाला पोटनिवडणुकीसाठी तयारी करण्यास सांगितलं आहे. मात्र या मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे हेही इच्छुक आहेत. पोटनिवडणुकीचं तिकीट न दिल्यास भाजपचा झेंडा हाती धरण्याचा अप्रत्यक्ष इशारा साबणेंनी दिला आहे. सुभाष साबणे यांनी प्रसंगी उमेदवारीसाठी भाजपात जायची तयारी ठेवली आहे. देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती टाळायची असेल तर आपल्याला शिवसेनेने उमेदवारी द्यावी, अशी मागणी साबणे यांनी केली आहे.


सुभाष साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते आहेत. ते तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. 1999 ते 2009 या काळात ते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तर 2004 मध्ये ते देगलूरमधून विधानसभेवर निवडून गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत (2019) ते देगलूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र रावसाहेब अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post