एसबीआयकडून सर्व ग्राहकांना महत्वाचा अलर्ट...३१ मे पर्यंत 'हे' काम करा

 एसबीआयकडून सर्व ग्राहकांना महत्वाचा अलर्ट...३१ मे पर्यंत KYC करा अन्यथा खाते गोठवणारनवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँकेकडून महत्त्वाची माहिती दिलीय. बँकेने एक अधिसूचना जारी केली असून, ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितलेय. जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुम्हाला हे काम 31 मेपर्यंत करावे लागणार आहे. केवायसी 31 मेपर्यंत करा, अन्यथा बँकिंग सेवा बंद होऊ शकेल, असंही बँकेने म्हटलेय. ग्राहकांना कोणताही त्रास होऊ न देता बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी 31 मे 2021 पर्यंत केवायसी अद्ययावत करणं आवश्यक आहे, असंही बँकेने स्पष्ट केलंय. 

बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर अधिसूचना जारी केली आहे. ग्राहक त्यांचे केवायसी कागदपत्रे त्यांच्या गृह शाखेत किंवा जवळच्या शाखेत सादर करू शकतात. कोरोनामुळे बँकेने ही सुविधा 31 मेपर्यंत वाढविली, म्हणजे आता ज्या खातेदारांचे केवायसी 31 मेपर्यंत अद्ययावत केले जाणार नाही, त्यांची खाती गोठविली जातील.

कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता एसबीआयने ग्राहकांना त्यांची कागदपत्र पोस्ट किंवा ईमेलद्वारे बँकेत पाठवून केवायसी अद्ययावत करण्याची परवानगी दिलीय. 31 मेपर्यंत अशी खाती गोठवू नयेत, असे बँकेने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना स्पष्ट सांगितलेय

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post