एमआर ट्रेड सेंटर वाडिया पार्क येथे अत्यल्प दरात आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था, लवकर मिळणार रिपोर्ट

 करोना महामारी थोपविण्यासाठी नगरमधील सामाजिक संस्थांनी दिलेले योगदान कौतुकास्पद : आ.संग्राम जगताप

एमआर ट्रेड सेंटर वाडिया पार्क येथे अत्यल्प दरात आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्थानगर : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जलद टेस्टिंग आणि ट्रेसिंग अतिशय महत्त्वाच्या आहेत. टेस्टिंग जितक्या लवकर होईल तितके उपचार लवकर सुरु करता येतात. नगर शहरात अशाच जलद टेस्टींगसाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्था योगदान देत आहेत, हे कौतुकास्पद आहे. नगर शहराला करोनामुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. अतिशय अल्प दरात आरटीपीसीआर चाचणीची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांची चांगली सोय झाली असून महानगरपालिकेच्या यंत्रणेलाही मोठी मदत होत आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

नगरमधील एम.आर.ट्रेड सेंटर वाडिया पार्क येथे सामाजिक संस्थांनी एकत्र येत अल्प दरात आरटीपीसीआर चाचणी स्वॅब संकलन केंद्र सुरु केले आहे. मुंबईस्थित मॉलीक्युलर लॅबच्या सहकार्याने याठिकाणी आरटीपीसीआर चाचणी होणार आहे. या केंद्राच्या शुभारंभप्रसंगी आ.जगताप बोलत होते. यावेळी सकल राजस्थानी युवा मंचचे संस्थापक धनेश कोठारी, जितो अहमदनगरचे चेअरमन अमित मुथा, बडीसाजन ओसवाल युवक संघाचे अध्यक्ष तुषार चोरडिया, सी.ए.असोसिएशन अहमदनगरचे चेअरमन सी.ए.संदीप देसरडा, निरज काबरा, अतुल जैन, संदीप बायड, मनोज चोपडा, रोशन चोरिडिया, धिरज लोढा, गौतम मुथा, गौरव हरबा आदी उपस्थित होते.

धनेश कोठारी म्हणाले की, करोनाचे संकट गंभीर होत असले तरी त्याला खंबीरपणे सामोरे जाणे आवश्यक आहे. यासाठीच जास्तीत जास्त लवकर चाचणी होणे व रूग्ण पॉझिटिव्ह असल्यास त्याचे विलीगीकरण होणे आवश्यक आहे. जितक्या लवकर उपचार सुरु होतील तितक्या लवकर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल. हिच बाब लक्षात घेवून आम्ही अवघ्या 499 रुपयांत आरटीपीसीआर चाचणीची सोय केली आहे. जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे.

अमित मुथा म्हणाले की, जितो अहमदनगर करोना काळात रूग्णांसाठी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी लवकरात लवकर टेस्टिंग, विलीगीकरण महत्वाचे आहे. आरटीपीसीआर चाचणी जलद होण्यासाठी आम्ही मुंबईस्थित मॉलीक्युलर लॅबशी करार करून त्यांची सेवा अतिशय नाममात्र दरात नगरकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे नागरिकांची चांगली सोय होणार असून जवाहर मुथा यांनी एमआर ट्रेड सेंटरमधील जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखून स्वॅब कलेक्शनची सोय करण्यात आली असून  व कमीत कमी वेळेत रूग्णांना रिपोर्ट उपलब्ध होईल. या सेंटरसाठी आ.संग्राम जगताप व महानगरपालिकेने मोलाचे सहकार्य केले आहे. एकजुटीने प्रयत्न केल्यास करोना महामारीचा आपण यशस्वीपणे सामना करू शकतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post