रियलमीच्या सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची किंमत आणखी कमी

 रियलमीच्या सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची किंमत आणखी कमीमुंबई : रियलमी कंपनीने (Realme) आपल्या लोकप्रिय स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. रियलमी 8 (Realme 8) असे या स्मार्टफोनचे नाव आहे. हा रियलमीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. त्यामुळे आता तुम्ही हा सर्वात स्वस्त 5G फोन आणखी कमी किंमतीत खरेदी करु शकता. या फोनसाठी ग्राहकांना 500 रुपये कमी मोजावे लागतील.

रियलमी कंपनीने हा फोन रियलमी 8 प्रो सह गेल्या महिन्यात लाँच केला होता. रियलमी 8 या स्मार्टफोनचं सुरुवातीला 4 जी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आलं होतं, त्यानंतर कंपनीने या फोनचे 5 जी व्हेरिएंटसुद्धा लाँच केले. दरम्यान कंपनी या फोनच्या काही स्पेक्समध्ये बदल केले आहेत. हा फोन 500 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे. म्हणजेच, आता आपण हा फोन 14,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यात तुम्हाला फोनचं बेस व्हेरिएंट मिळेल. फोनचे दोन्ही व्हेरिएंट कमी किंमतीत उपलब्ध आहेत. या सवलतीसह फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर हा फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post