आघाडीच्या मंत्र्यांनी कोविड संकटात तरी शहाणपणा शिकायला पाहिजे होता

आघाडीच्या मंत्र्यांनी कोविड संकटात तरी शहाणपणा शिकायला पाहिजे होता : आ.राधाकृष्ण विखे पाटीलनगर :  महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी कोविड संकटात तरी शहाणपणा शिकायला पाहिजे होता. परंतु दुर्दैवाने फक्त केंद्र सरकारला दोष देण्याचे षडयंत्र रचताना राज्य सरकार आपले दायित्व पूर्णपणे विसरले असल्याची टिका भाजपाचे नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.


राहाता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 18 ते 45 या वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ आ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, वैद्यकीय अधिकारी गोविंद घोगरे, गणेश कारखान्याचे चेअरमन मुंकूदराव सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पिपाडा, भाजपचे उपाध्यक्ष रघुनाथ बोठे, युवा मोर्चाचे अध्यक्ष सतिश बावके आदी उपस्थित होते.


आ. विखे पाटील म्हणाले की, लसीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहील्यांदा ज्येेष्ठ नागरिक आणि कोविड योध्द्यांना प्राधान्य दिले. संकटाची भीषणता लक्षात घेवून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. केंद्र सरकार लस उपलब्ध करून देण्यात कमी पडत नाही. आता इतर देशांमधूनही लसीची उपलब्धता करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा सुरू झाला असल्याने लसीची मात्रा मोठ्या संख्येने उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा वेळ फक्त केंद्र सरकारवर टिका करण्यात जात आहे. आघाडी सरकार कोविडच्या संकटातही शहाणपण शिकले नसल्याची टिका करून सरकारच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना आरोग्य सुविधांसाठी वणवण करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post