काळ्या बाजारात विक्रीस चालवलेला रेशनचा धान्यसाठा जप्त

 

काळ्या बाजारात विक्रीस चालवलेला रेशनचा धान्यसाठा जप्तनगर: रेशनिंगचा काळाबाजारात जाणारा तांदूळ, गहू कर्जत पोलिसांनी पकडला. 82 गोण्या तांदूळ, 8 गोण्या गहू, दोन चारचाकी वाहने असा 10 लाख 44 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मंगळवारी राशीन- कर्जत रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली.

तिघांविरूद्ध गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक केली आहे. बाळासाहेब दादासाहेब ढेरे (वय 25), रेवणनाथ मुरलीधर ढेरे (वय 39), श्रीकांत प्रकाश ढेरे (वय 25 सर्व रा. विटा ता. करमाळा जि. सोलापूर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, भगवान शिरसाठ, पोलीस कर्मचारी तुळशीदास सातपुते, मारुती काळे, भाऊसाहेब काळे, संभाजी वाबळे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे, देविदास पळसे, शाहूराज तिकटे यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post