घराबाहेर पडणार असाल तर कोविड टेस्टची तयारी ठेवा, नगर शहरासह जिल्ह्यात विशेष मोहीम

 

नगर शहरासह जिल्ह्यात विनाकारण घराबाहेर फिरणार्यांची रॅपिड ॲंटीजेन टेस्ट
 नगर: करोना रोखण्यासाठी आता प्रशासनाने टेस्टिंग वाढवण्यासाठी पाऊल उचलली आहेत. कडक निर्बंध लागू असताना अनेक जण विनाकारण घराबाहेर फिरत असल्यामुळे आता नगर शहरासह जिल्ह्यात प्रमुख ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत दंडात्मक कारवाई तसेच रॅपिड ॲंटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. सोमवार दिनांक १७ मे पासून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जाहीर केले आहे.

अहमदनगर शहरात चार ठिकाणी व जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडाच्या कारवाई व्यतिरिक्त वैद्यकिय पथकामार्फत कोव्हीड टेस्ट देखील करण्यात येईल.

त्यामधे पॅाझिटीव्ह आढळणाऱ्या नागरीकांना सरळ शासकिय कोव्हीड केअर सेंटर मधे दाखल करण्यात येईल, तसेच त्यांच्या कुटुंबियांची देखील कॅान्टॅक्ट ट्रेसींग करून कोव्हीड टेस्ट करण्यात येईल याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post