जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अलर्ट... पुढील ५ दिवस पावसाचे...


जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अलर्ट... पुढील ५ दिवस पावसाचे...



नगर :   जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वर्तविला आहे.पुढील पाच दिवस आकाश काही ठिकाणी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दि. 15 ते 16 मे रोजी जोराचे वारे व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका तर दि. 17 ते 18 मे रोजी जोराचे वारे व विजेच्या कडकडाटांसह काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


- पावसाची शक्यता असल्याने, कापणी केलेली पिके शेडमध्ये किंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत.


- पिकाची काढणी शक्यतो सकाळच्या वेळेतच करावी व पावसापूर्वी करून घ्यावी.


- फळ पिकाचे संरक्षण करण्यासाठी बांबू किंवा लाकडी काड्यांचा आधार देऊन प्लॅस्टिक दोरीच्या सहाय्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत.

- पावसाच्या शक्यतेमुळे, विद्युत उपकरणाचा संपर्क टाळा. जनावरांना उघड्यावर चरावयास पाठवू नये.

- शेडमध्ये पाणी साचू नये, याची काळजी घ्यावी. जर पाणी साठलेल्या कोरड्या चार्‍यावर पडले आणि बुरशीचे आक्रमण आढळले तर तो चारा जनावरांना देऊ नये.

- शेतातील कामे शक्यतो टाळावीत.

- हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल अ‍ॅपचा वापर करावा. विजेच्या अंदाजाचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल अ‍ॅपचा वापर करावा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post