शक्तीशाली लोकांकडून पुनावाला यांना लसीसाठी धमक्या,लस उत्पादन भारताबाहेर हलवणार?

 सिरम लस उत्पादन भारताबाहेर हलवणार ? भारतात शक्तीशाली लोकांकडून पुनावाला यांना लसीसाठी धमक्यालंडन : भारतासाठी धक्कादायक बातमी आहे. भारतातील 90 टक्के कोरोना लसींचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी भारतातील श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून धमक्या मिळत असल्याचं सांगितलंय. तसेच यामुळे आगामी काळात भारताबाहेर ब्रिटनमध्ये कोरोना लसीचं उत्पादन करण्याबाबत सूचक इशारा दिलाय. ते आंतरराष्ट्रीय मॅगेझिन टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पुनावाला जगातील सर्वात मोठे कोरोना लस उत्पादक आहेत.

अदर पुनावाला म्हणाले, “भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांचे प्रमुखांचा समावेश आहे. हे सर्व सीरमच्या एस्ट्रा झेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत. यांना धमकी म्हणणंही कमी ठरेल. आक्रमकपणा आणि अपेक्षांचा स्तर अभूतपूर्व आहे.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post