रस्त्यात हरवलेली २ लाखांचा ऐवज असलेली पर्स महिलेला मिळाली परत... नगरमधील युवकाचा प्रामाणिकपणा

 

रस्त्यात हरवलेली २ लाखांचा ऐवज असलेली पर्स महिलेला मिळाली परत... नगरमधील युवकाचा प्रामाणिकपणानगर- सोन्यांचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ५ हजार रूपयांचा मुद्देमाल असलेली पर्स एकाला तारकपूर परिसरात सापडली. त्याने प्रामाणिकपणा दाखवत ती तोफखाना पोलीस ठाण्यात जमा केली. ही पर्स ज्या महिलेची होती तिला पोलिसांनी ती परत केली.

जिल्हा रूग्णालयात काम करणार्‍या सुनिता किसन व्हटकर (रा. गुलमोहर रोड, नगर) या 30 एप्रिल रोजी तारकपूर येथून जात असताना त्यांची पर्स हरवली होती. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी वस्तू मिसींगची नोंद केली होती.


दरम्यान, त्याच दिवशी हरवलेली पर्स राजकुमार नारंग (रा. लालटाकी, नगर) यांना सापडली. नारंग यांनी प्रमाणिकपणा दाखवत सदरची पर्स पोलिसांकडे दिली. पोलिसांनी ती पर्स सुनिता व्हटकर यांना देऊन टाकली. नारंग यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहायक निरीक्षक किरण सुरसे यांनी त्यांचा सत्कार केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post