मोठी बातमी...पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार नगर जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा

 

मोठी बातमी...पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार नगर जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावानगर  - पंतप्रधान नरेंद्र मोदी  गुरूवारी दि. 20 रोजी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी थेट जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत. देशातील 56 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, सोलापूर, चंद्रपूर, नाशिक, सातारा, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, अमरावती, वर्धा, पालघर, उस्मानाबाद, जालना, लातूर, नागपूर, परभणी व बीड या जिल्ह्यातील अधिकार्‍यांशी पंतप्रधानांचा संवाद होणार आहे.

गुरुवारी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त हे सहभागी होणार आहेत. कोरोनासंबंधी गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post