संतापजनक....रुग्ण तडफडत असताना मनपाचे 'प्लाझ्मा' निर्मिती मशीन रक्तपेढीत धूळखात पडून

 मनपाच्या रक्तपेढीला आरोग्य समितीची भेट


प्लाझ्मा निर्मितीचे मशीन महापालिकेच्या रक्तपेढीत धूळखात पडून अहमदनगर -कोविड रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्लाझ्मादान सर्वात महत्त्वाचा उपाय आहे.यासाठी कोरोनारुग्णांनी आपला प्लाझ्मा दान करून कोरोना रुग्णांनाचे जीव वाचविण्यासाठी पुढे यावे असे आव्हान शासनाच्या वतीने करण्यात येते परंतु अहमदनगर महानगरपालिकेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मनपा रक्तपेढीतील लाखो रुपयाचे प्लाझ्मा निर्मिती मशीन धूळखात पडून आहे.तरी हे मशीन लवकरात-लवकर सुरू करण्यासाठी मनपा आरोग्य समितीच्या वतीने पुढाकार घेतला असून मनपा आयुक्तांशी चर्चा करून लवकरच हे सुरु करण्यात येईल, आ.संग्राम जगताप यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मनपाच्या रक्तपेढीसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मशीन खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिला होता.परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या काळात आरोग्य सेवेपासून वंचित ठेवले जात आहे असा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे यांनी केला.
     मनपा आरोग्य समितीच्या वतीने कै.बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीला भेट देऊन माहिती घेतांना समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे,सदस्य निखिल वारे, सदस्य संजय ढोणे,सदस्य सतीश शिंदे आदी उपस्थित होते.
      निखिल वारे पुढे म्हणाले की,शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असतात परंतु महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा व दुर्लक्षामुळे गेल्या दोन वर्षापासून सिटीस्कॅन मशिन जागेअभावी धूळ खात पडून आहे. कोरोनाच्या संकट काळामध्ये नगर शहरातील कोरोना रुग्णांना HRCT चाचणीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला परंतु हेच महापालिकेच्या सिटीस्कॅन मशिन चालू असते तर हा खर्च वाचला असता व सर्वसामान्य रुग्णांना मनपाच्या वतीने आरोग्य सेवा देता आली असती.तसेच आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कै.बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीला मशिन खरेदीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता परंतु मनपाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे प्लाझ्मा निर्मितीचे मशीन पॅथॉलॉजिस्ट अभावी गेल्या दोन वर्षभरापासून धूळ खात पडून आहे.आज हे मशीन सुरु असते तर हजरो कोरोना रुग्णांचा जीव वाचला असता तसेच गोरगरीब रुग्णांना माफक दरात किंवा विनामूल्य आरोग्य सेवा देता आली असती असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post