तुरटीमुळे करोना प्रादुर्भाव कमी होतो ! पीआयबीने केला मोठा खुलासा

 तुरटीमुळे करोना प्रादुर्भाव कमी होतो ! पीआयबीने केला मोठा खुलासासध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे.  सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या चर्चांना उधाण येतंय. यात अनेक चुकीची माहिती  व अफवादेखील  पसरत आहेत. यामध्येच सध्या तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतो, असं सांगणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे अनेकांनी या माहितीची सत्यता न पडताळता थेट प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ही माहिती चुकीची असून 'तुरटीच्या पाण्यामुळे  कोरोना बरा होतो', असा दावा कोणत्याही डॉक्टर वा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने (PIB) या व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर आणलं आहे. 

"व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुरटीच्या पाण्यामुळे #Covid19 बरा होतो किंवा त्यापासून सुटका होते, असं सांगण्यात आलं आहे. मात्र, ही माहिती खोटी आहे. #PIBFactCheck नुसार, ही माहिती चुकीची व खोटी आहे. त्यामुळे कोरोनावर मात करायची असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करा", असं ट्विट PIB ने केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post