मास्कमुळे शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होते? समोर आला महत्वपूर्ण खुलासा

 मास्कमुळे शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होते? समोर आला महत्वपूर्ण खुलासाकोरोनापासून वाचण्यासाठी दोन मास्क वापरण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला. अशातच कोरोनाविरोधात आतापर्यंत आपली सर्वात मोठी ढाल ठरलेलं मास्कमुळे शरिरातील ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे. पीआयबीच्या (PIB) फॅक्ट चेक टीमनं या व्हायरल मेसेजची पडताळणी केली आहे. 


हा मेसेज सध्या सोशल मीडियावर  मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकही या मेसेजवर विश्वास ठेवत असल्याचं समोर आलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजची पडताळणी केली.

पीआयबीचं फॅक्ट चेक -PIBFactCheck यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर वरील मेसेज फेक आणि चुकीचा असल्याचं सांगितलं आहे. PIB Fact Check ने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, "मास्क वापरमुळे ऑक्सजन पातळी खालवत असल्याचा मेसेज फेक आणि बनावट आहे. यावर विश्वास ठेवू नये. हा दावा पूर्णतः खोटा आहे. याचे कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी मास्कचा वापर आवश्य करा. सुरक्षित अंतर पाळणं आणि हात वारंवार धुणं हे उपाय परिणामकारक आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post