मॉडर्नाची फायझर लसही भारतीयांना मिळण्याची शक्यता, ५ कोटी डोससाठी चर्चा

 

मॉडर्नाची फायझर लसही भारतीयांना मिळण्याची शक्यता, ५ कोटी डोससाठी चर्चानवी दिल्ली : भारतात  लसीकरणाचा तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पण देशासमोर कोरोनाच्या लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे. आता त्यावर उपाय म्हणून सरकारच्या वतीनं लसी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारत सरकार आणि अमेरिकन लस निर्मिती करणारी कंपनी फायझर यांच्या दरम्यान एक उच्च स्तरीय चर्चा अंतिम टप्प्यात आली असून या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत देशाला पाच कोटी लसीचे डोस मिळण्याची शक्यता आहे.


भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. त्यात आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीची आयात करण्यात आली आहे. फायझर आणि मॉडर्ना या कंपनींनी त्यांच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी अशी विनंती  भारत सरकारकडे केली होती. आता फायझरच्या लसीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून मॉडर्नासोबतही चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post