राज्यातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 

राज्यातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन मोठ्या शस्त्रक्रियांनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी कोरोना संकटाच्या काळात काही घटकांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या, असा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे. 


‘कोरोना जागतिक महामारीच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्यानं पुनश्च संचारबंदीचा निर्णय़ राज्य सरकारला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून, हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत मला अवगत केले. त्यांनी प्रामुख्याने मांडलेल्या काही मागण्यांकडे आज राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले’, अशी माहिती पवार यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post