कॉंग्रेसकडून दे धक्का.... शिवसेनेकडून विधानसभा लढवणारे पाटील यांचा पक्षप्रवेश

 

शिवसेनेला कॉंग्रेसकडून दे धक्का.... शिवसेनेकडून विधानसभा लढवणारे पाटील यांचा पक्षप्रवेशवसई - महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने वसईमध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून लढणारे विजय पाटील यांनी मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे

पालघर लोकसभा खासदारकीचा उमेदवार म्हणून हा पक्ष प्रवेश झाला असल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे वसईचे आमदार आणि बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर शिवसेना उमेदवार म्हणून पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती.  आता नाना पटोले यांनी काँग्रेस प्रवेश केल्यानंतर त्यांना पालघर जिल्हा अध्यक्ष केले आहे.  

.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post