आ.लंके यांच्या कार्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले कौतुक

आ.लंके यांच्या कार्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले कौतुक नगर: जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहून आ.निलेश लंके अधिकाधिक उत्कृष्ट काम करत आहेत. लंके यांनी उभारलेले कोविड सेंटर फारच दिशादर्शक काम करत आहे. असंख्य रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. रुग्णांना दिला जाणारा आहार हा पोषक आहार आहे. तसेच स्वतः आमदार रुग्णांची काळजी घेतात ही कौतुकाची बाब आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाळवणी येथील कोविड सेंटरचे कौतुक केले.‌‌शनिवारी नगर दौर्यात मंत्री जयंत पाटील यांनी शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरास भेट दिली. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी मान्यवर उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post