लसीकरण केंद्रांवर उपर्यांचीच जास्त गर्दी.... स्थानिक वंचित..... भाजपचे आक्रमक आंदोलन

पाथर्डीत लसीकरण केंद्रांवर बाहेरच्या लोकांचीच गर्दी, 'भाजयुमो'चे आंदोलनपाथर्डी:शहरातील लसीकरण केंद्रावर पाथर्डी तालुक्यातीलच नागरिकांना कोरोनाची लस मिळाली पाहिजे,तालुक्या बाहेरील लोकांचे लसीकरण करू नये,अशी मागणी करत आज  सकाळी भाजपा युवामोर्चाचे जिल्ह्या उपाध्यक्ष अमोल गर्जे व सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद करून आंदोलन केले.उद्या पासून तालुक्या बाहेरील लोकांचे लसीकरण आम्ही होऊ देणार नाही.असा इशारा यावेळी गर्जे यांनी दिला आहे.


 पाथर्डी तालुक्यातील जनतेला कोरोनाच्या आजारात वाऱ्यावर सोडून तालुक्या बाहेरील लोकांचे लसीकरण थांबवून प्राधान्याने स्थानिकांनाच लस द्यावी अशी मागणी लसीकरण केंद्रावर असलेले नायब तहसिलदार पंकज नेवसे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे,सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे कायंदे ,प्रवीण पाटील यांच्याकडे केली आहे.  कोरोना लसीकरणासाठी तीन दिवसांपासून ऑनलाईन नोंदणी करून १८ ते ४४ यावयोगटातील लोकांनाच लसीकरण होत आहे.दररोज २०० व्यक्तीचे लसीकरण चालू असून आज पर्यंत ६०० व्यक्ती पैकी  ५०० जण हे तालुक्या बाहेरील आहे.परंतु ऑनलाईन प्रणालीमुळे तालुक्यातील नागरिकांवर अन्याय होऊन लस मिळणे मुश्किलीचे झाले आहे.कोरोनाची लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते,तरी लस टोचून घेणाऱ्या सर्वच लोकांनी ही नोंदणी करताना ज्या त्या भागातील लसीकरण केंद्र निवडून आपलाच तालुका स्थानिक लसीकरण केंद्रावर कशी लस घेता येईल त्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती गर्जे यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post