किमान आठवडाभर कडकडीत लॉकडाऊन करावा

 

किमान आठवडाभर कडकडीत लॉकडाऊन करावापाथर्डी: तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाथर्डी कडकडीत लॉकडाऊन करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी प्रांतधिकारी देवदत्त केकाण यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. यावेळी तहसिलदार शाम वाडकर, नायब तहसिलदार पंकज नेवसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे, पालिकेचे मुख्यधिकारी धनंजय कोळेकर,गुप्तवार्ता चे भगवान सानप,पंचायत समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गर्जे म्हणाले,पाथर्डीत गेल्या काही दिवसामध्ये कोरोना मुळे जेष्ट नागरिकांसह युवकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जिल्हाबंदी, संचारबंदी असताना देखील चौका चौकात नागरिक मोठी गर्दी होते. गर्दी रोखण्यात प्रशासन पूर्णपणे अयशस्वी ठरत आहे. त्यातून अनेक कोरोना रुग्ण बाहेर मोकाट फिरताना आढळत आहेत. परिणामी कोरोनाची साखळी वाढत आहे. शहर व तालुका कोरोनाच्या महा भयंकर सकटात सापडला आहे. पालिका प्रशासन कोरोनाच्या काळात कोणतेही ठळक उपाय योजना करीत नाही. . लसीकरण केंद्रावर नियोजन शून्य असून मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.गर्दीतूनच कोरोनाचा प्रसार होत असून आठ दिवसाचे कडकडीत बंद करण्याची मागणी गर्जे यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post