ॲलोपॅथी सर्वगुणसंपन्न आहे तर ॲलोपॅथी डॉक्टर आजारी का पडतात? रामदेव बाबांनी IMA ला विचारले २५ प्रश्न

 ॲलोपॅथी सर्वगुणसंपन्न आहे तर ॲलोपॅथी डॉक्टर आजारी का पडतात? रामदेव बाबांनी IMA ला विचारले २५ प्रश्न नवी दिल्ली : अलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेलं वादग्रस्त विधान मागे घेतल्यानंतर आता योगगुरु रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी औषध कंपन्या आणि इंडियन मेडिकल असोसिएशला २५ प्रश्न विचारले आहे. काही आजारांवर ठोस उपाय आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले आतहे. तसेच अ‍ॅलोपॅथीत उपचार इतके गुणकारी आहेत, तर अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी आजारी पडणं योग्य वाटत नाही, असा टोलाही हाणला आहे. थायरॉइड, ऑर्थरायटीस, कोलायटिस, दमा आणि हेपेटायसिस यासारख्या आजारांवर एक एक करत त्यांनी २५ प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नाचं पत्रक त्यांनी ट्विटरवर शेअर केलं आहे.

'अ‍ॅलोपॅथी औषध कंपन्यांकडे करोना रुग्णांना विना ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन क्षमता वाढवण्यासाठी उपाय आहेत का?, उच्च रक्तदाबासाठी काही प्रभावी औषध आहे का? ' असे प्रश्न योगगुरु रामदेव यांनी विचारले आहेत. 'अ‍ॅलोपॅथीत टाइप-१ आणि टाइप-२ डायबिटीजवर कायमस्वरुपी औषध आहे का?', असा प्रश्नही त्यांनी पत्रात विचारला आहे. पायरोरिया, मायग्रेन, कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसरायड्स, सोरायसिस, पार्किन्सन, निद्रानाश, अ‍ॅसिडिटी यासारख्या आजारांबाबतही प्रश्न विचारले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post