जिल्ह्यातील 'या' पोलिस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली

 पोलिस निरीक्षक अभय परमार यांची नियंत्रण कक्षात बदलीनगर  : पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची अकोले पोलीस ठाण्यातून थेट अहमदनगर नियंत्रण कक्षात  बदली केली आहे. त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या पाच महिन्यांच्या कार्यकाळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अकोले पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी पकडल्याच्या घटना घडल्या.  लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचा विनाकारण फिरणार्‍यांवर कोणताही अंकुश राहिलेला दिसत नव्हता. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय सुरूच होते. त्यामुळे परमार हे वादग्रस्त ठरले होते.जिल्ह्याचे पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी याबाबत काल शनिवारी आदेश काढला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post