नियमित योग प्राणायाम कोणत्याही आजाराला तुमच्या जवळ फिरकू देणार नाही

 नियमित योग प्राणायाम केल्यास कोणत्याही आजाराला दूर ठेवता येते : अनिल मेहेर


आनंदऋषीजी योगा सेंटरतर्फे झूम ॲपद्वारे ऑनलाईन योग प्राणायाम प्रशिक्षण वर्गनगर: करोना महामारीत प्रत्येक जण आरोग्याबाबत सजग झाला आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणे आवश्यक बनले आहे. यादृष्टीने नियमित योग प्राणायाम अतिशय उपयुक्त असून रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास निश्चित मदत होते. त्यामुळे करोनासह इतर आजारही दूर राहण्यास मदत होते, असा विश्वास नगरमधील योग तज्ज्ञ व प्रशिक्षक अनिल मेहेर यांनी व्यक्त केला.

भारतीय योग विद्या जगभरात अंगिकारली गेली आहे. मेहेर स्वतः गेल्या ३० वर्षांपासून आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आनंदऋषीजी योगा सेंटरमध्ये योग प्रशिक्षण देत आहेत.‌ आतापर्यंत हजारो साधकांनी याचा लाभ घेतला आहे. आता करोना काळातही योग प्रसाराचे व प्रशिक्षणाचे कार्य विनाखंड चालू असून सध्या ऑनलाईन पद्धतीने रोज सकाळी ६.१५ ते ७.१५ यावेळेत झूम ॲपद्वारे वर्ग चालतात. नागरिक घरबसल्या संपूर्ण कुटुंबासह या योग प्राणायाम वर्गाचा लाभ घेत आहेत. रोज नित्यनेमाने जलद हालचाली, योगासन प्राणायाम, सूर्यनमस्कार केल्यास करोनाला सहज हरवणे शक्य आहे. ऑक्सिजन लेव्हल कमी होत नाही. याशिवाय इतर अनेक आजारही दूर ठेवता येतात असे खात्रीने सांगू शकतो, असं मेहेर यांनी म्हटलंय.

जास्तीत जास्त साधकांनी योग प्राणायामाचा स्विकार करून करोना काळातील भिती बाजूला सारावी. सकारात्मक विचार, नियमित योग प्राणायाम आजाराला लांब ठेवेल. यासाठी सर्वांनी झूम ॲपद्वारे सुरू असलेल्या वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ.अर्चना मेहेर यांनी केले आहे. ऑनलाईन वर्गात सहभागी होण्यासाठी झूम लिंक खालील प्रमाणेJoin Zoom Meeting

https://us04web.zoom.us/j/77977793307?pwd=Z3BnWWhuYVpERTU3SkVveTZtVThFUT09


Meeting ID: 779 7779 3307

Passcode: ARYC@123

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post