संडे हो या मंडे... नॉनव्हेज खावो जमके..शहरासह गावांत मांसाहार प्रचंड वाढला

 

कोरोनामुळे शाकाहारींचा मांसाहाराकडे कल वाढला, शहरासह ग्रामीण भागात अंडी, चिकन, मटण विक्री जोमातनगर : कोरोनाची बाधा झालेल्या लोकांना डॉक्टर मांसाहारी आहार घेण्याचा सल्ला देत आहेत . आजारातून लवकरात मुक्तता होण्यासाठी बाधीत लोक ' डॉक्टर ' की सल्ल्याला मान देत आहेत.ज्यांनी कधी मांसाहार केला नाही त्यांच्यावर मांसाहार करण्याची वेळ कोरोनाने आणली आहे . ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचा उद्रेक होत आहे . अनेक गावात बाधीत रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे .बाधीत रुग्णांना औषधोपचाराबरोबरच आहारात अंडी , मटन घेण्याचा सल्लाच डॉक्टर देत आहेत . डॉक्टरांचा सल्ला लोकं झटकण आमलात आणत आहेत . महागडी औषध घेण्याबरोबरच सकस आहाराचे नियोजनही बाधीत रुग्ण करत आहेत. अंडी , मटन , चिकन आहारात घेतल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याचे डॉक्टर सांगत असल्याने घराघरात रोजच मांसाहारी जेवणाचा बेत आखला जात आहे .

           गावातील वर्षातून एकदा येणाऱ्या यात्रानिमित्त ग्रामदेवताला बोकडांचा बळी देण्याची रूढी परंपरा अजुनही अनेक गावात सुरू आहे . अनेक गावात ग्रामदैवतांपुढे बळी देण्याची प्रथा बंद झाले आहे .जत्राच्या निमित्ताने अनेक गावात वर्षातुन एकदाच बोकडाचा बळी दिला जातो .  त्याच गावात रोज बोकडांची कत्तल होताना दिसत आहे . वाळकी  , चिचोंडी पाटील , रुई छत्तीशी , अरणगाव आदी बाजारपेठेची गावे व शहरातून लोक मटण आणत होते . मात्र कोरोनामुळे लोकांवर अनेक निर्बंध लादल्याने लोकांची मोठी पंचाईत झाली .परिणामी गावोनावी चिकन  , मटनचे दुकाने थाटली असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे .  मागणी वाढल्याने अंडी , चिकन , मटन आदींच्या दरात मोठी वाढ झाली असली तरी लोकं खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे दिसत आहे .बाधीत रुग्णांसाठी आहार हा महत्वाचा घटक आहे .आहारात अंडी , मटन , चिकन घेलल्याने शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते . मटन  , चिकन , अंडी यामध्ये प्रोटीन , व्हिटॅमिन बी , व्हिटॅमिन बी २ , झिंग , अर्म , व्हिटॅमिन डी , कॉन्टेर्म , व्हिटॅमिन एडीइ यासारखे शरीरास पोषख घटक आढळून येत आहेत . हे घटक शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करत असतात

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post