पाथर्डी तालुक्यात कोणत्याही परिस्थितीत गृह विलीनीकरण नाही, संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करणार

 कोणत्याही परिस्थितीत गृह विलीनीकरण नाही, संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करणार   पाथर्डी:कोरोना बाधित रुग्णांनी घरात न राहाता डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर अथवा कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेऊन राहावे.जर संबंधित बाधित व्यक्ती घरात विलगीकरणात असेल  तर  गुन्हे दाखल केली जातील, अशी कडक भूमिका तालुका प्रशासनाने घेतली आहे.

 पंचायत समितीच्या  गटविकास अधिकारी शितल खिंडे,तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे,पशुसंवर्धन अधिकारी डॉ जगदीश पालवे,विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, दादासाहेब शेळके,बाळासाहेब तिडके,प्रमोद मस्के यांनी अचानक तालुक्यातील वेगवेगळ्या गावात जाऊन जे कोरोना पॉझिटिव रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. अश्यांच्या थेट भेटी घेत  त्या रुग्णांनी तात्काळ त्यांच्यातील लक्षणानुसार कोविड सेंटर किंवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्षात रवानगी केली जाते आहे.

यावेळी गट विकास अधिकारी शीतल खिंडे म्हणाल्या की,तालुक्यातील गृह विलगीकरण पूर्णपणे बंद करणे आवश्यक असून कोणीही गृह विलगीकरणात राहू नये. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असेल  किंवा कोरोनाचे सदृश्य लक्षणे आहेत. त्यांनी तात्काळ कोविड केअर सेंटर अथवा रुग्णालय तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वतःहून विलगीकरण करावे व उपचार घ्यावीत. यामुळे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. कुटुंबातील व गावातील इतर व्यक्तींना कोरोना रोगाची बाधा होणार नाही. पंचायत समिती स्तरावरून यासाठी पथक तयार करून ग्रामीण भागात तपासणी मोहीम चालु आहे. 


कोरोना काळात गावातील सर्वानी एकत्रित पणे येऊन प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने घरात न थांबता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेऊन स्वतंत्रपणे कोविड सेंटरच्या विलगीकरणात राहावे. ;-पंचायत समिती सभापती सुनीता गोकुळ दौंड 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post