महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीचे नगरमध्ये आंदोलन

 महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीचे नगरमध्ये आंदोलननगर  : देशातील नागरिक एकीकडे कोरोना सोबत दोन हात करत आहेत तर दुसरीकडे महागाईशी संघर्ष. केंद्र सरकारने  पेट्रोल, डिझेल, गॅस, यांची भाववाढ मोठ्या प्रमाणात केली आहे. सर्वसामान्य माणसाचे महागाईने जनजीवन विस्कळित झाले आहे. कौटुंबिक बजेट सांभाळताना लोकांच्या नाकी नऊ आले आहेत. खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. या महागाईच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयात येथे  अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. वतीने आंदोलन केले.

वाढत्या महागाईच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. सोबत अंबादास गारुडकर (प्रदेश सरचिटणीस), किसनराव लोटके (जिल्हा उपाध्यक्ष), अशोक बाबर (जेष्ठ नेते,प्रदेश प्रतिनिधी),प्रा. सिताराम काकडे(सरचिटणीस) अरीफभाई पटेल(सरचिटणीस), प्रशांत गायकवाड (संचालक जिल्हा बॅंक), केशव बेरड(सरचिटणीस).

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post