मनपाचा दणका...२ बड्या हॉस्पिटलची मान्यता रद्द

 करोना रुग्णांची आर्थिक लूट, २ बड्या कोविड हॉस्पिटलची मान्यता रद्दनाशिक: करोना बाधित रुग्णांची आर्थिक लुट करणे, महापालिकेच्या नियमानुसार ८० टक्के राखीव खाटांवर रुग्णांना दाखल करून न घेणे आणि पालिकेच्या लेखापरिक्षकांना बिले तपासणीसाठी न दिल्याप्रकरणी शहरातील मेडीसीटी व रामालयम या दोन बड्या रुग्णालयांची मान्यता रद्द करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जाधव यांनी दिले आहेत. या दोन्ही रुग्णालयांची कोविड रुग्णालयांची मान्यता देखील रद्द करण्यात आली आहे. नाशिकरोड येथील एका बड्या रुग्णालयाची देखील मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने खासगी रुग्णालयासाठी हा मोठा दणका मानला जात आहे.

दर नियंत्रण समितीचे अध्यक्ष मुख्य लेखा परिक्षक बी.जी.सोनकांबळे यांनी या दोन्ही रुग्णालयांना नोटीस दिली होती.परंतु,त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.त्यामुळे याची गंभीर दखल आयुक्त कैलास जाधव यांनी घेत, या दोन्ही रुग्णालयांना दणका दिला आहे. या दोन्ही रुग्णालयांची कोविड रुग्णालयांची मान्यता रद्द केली असून त्यांची पालिकेकडे असलेली नोंदणी रद्द करण्याचे आदेश वैद्यकीय विभागाला दिले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post