फडणवीस यांची सोशल मीडियावर बदनामी, ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 फडणवीस यांची सोशल मीडियावर बदनामी, ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखलनाशिक- नाशिक शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा बिटको रूग्णालयात व्हीडीओ काढून सोशल मिडीयावर बदनामी केल्या प्रकरणी नाशिक पोलीसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

बिटको रूग्णलयात ते पाहणी करत असताना काहींनी त्यांचा व्हीडीओ काढून सोशल मिडीयावर शिवराळ टिप्पणीसह तो व्हायरल केला. त्यामुळे भाजपाचे नाशिकरोड येथील ब्लॉक अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी पोलीसांत तक्रार केली आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांची बदनामी केल्या प्रकरणी रतन खालकर, संकेत भोसले, प्रमोद कोहकंडे, राहूल जोशी आणि बंटी ठाकरे अशा पाच जणांच्या विरोधातअदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post