अखेर ममतांनी नंदीग्रामही जिंकले, शुभेन्दु अधिकारी यांचा पराभव

 

अखेर ममतांनी नंदीग्रामही जिंकले, शुभेन्दु अधिकारी यांचा पराभवकोलकाता: देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांनी 1200 मतांनी विजय मिळवला आहे. 

पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या कलावरून सध्या तृणमूल काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असंच दिसतंय. पण नंदीग्राममध्ये मात्र सुरुवातीपासूनच अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. सुरुवातीला भाजपच्या शुभेन्दु अधिकारी यांनी ममतांना पिछाडीवर टाकत मोठी आघाडी घेतली होती. नंतर काही वेळाने ममता दीदींनी पुन्हा कम बॅक करत 2700 मतांची आघाडी घेतली. पण ही आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही. नंतर लगेचच शुभेन्दु अधिकारी पुन्हा एकदा आघाडीवर गेले. नंदीग्राममधील मतमोजणीमुळे क्षणाक्षणाला अनेकांचा काळजाचा ठोका चुकत होता. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post