मोबाईल फुटल्याने वाद... सुनेने केला सासूचा गळा आवळून खून

 किरकोळ कारणावरून सुनेने केला सासूचा गळा आवळून खूनपुणे : पुणे जिल्ह्यातील तळेगावमध्ये किरकोळ कारणावरून सुनेने सासूचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस चौकशीदरम्यान खुनाचे मूळ कारण पुढे आले आहे. अडीच वर्षीय नातवाने आजीचा मोबाईल खेळण्यासाठी घेतला होता. तो, खेळत असताना फुटला यावरून आजीने नातवाला सुनावले तसेच मोबाईल कोण भरून देणार यावरून सुनेचे आणि सासूचे वाद झाले. यातूनच घरातील ब्लाउज घेऊन अडीच वर्षीय मुलासमोरच सुनेने सासूचा गळा आवळून खून केला असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

पूजा शिंदे आणि तिचा पती म्हणजेच मृत महिलेचा मुलगा मिलिंद शिंदे अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना ५० वर्षीय बेबी शिंदे यांची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलीय.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पूजा आणि मिलिंद या दोघांचं २०१७ साली लग्न झाले. शिंदे कुटुंबात सासू बेबी शिंदे, दिर असा चार जणांचे एकत्रित कुटुंब होत. दरम्यान, काही महिन्यातच सून पूजा आणि सासू बेबी यांच्यात खटके उडण्यास सुरवात झाली. दोघींचे अजिबात पटत नव्हते, अनेकदा किरकोळ करणावरुन या दोघींमध्ये अगदी टोकाचे वाद व्हायचे. 

दिनांक २१ मे रोजी नातवाने आजीचा मोबाईल खेळण्यासाठी घेतला होता. तो त्याच्याकडून फुटला यावरून पूजा आणि तिच्या सासूमध्ये मोठा वाद झाला. याच वादातून पूजाने अडीच वर्षीय मुलासमोरच ब्लाउज ने सासूचा गळा आवळून खून केला. ही घटना घडली तेव्हा, घरात अडीच वर्षीय मुलाव्यतिरिक्त कोणीही नव्हते. मृतदेह राहत्या घराच्या टेरिसवर पोत्यात घालून लपवून ठेवला. मात्र, काही तासांनी टेरिसवर दुर्गंधी येत असल्याने इतरांना संशय आला हेच पाहून पूजाने पोत्यात टाकलेला मृतदेह ओढत ओढत शेजारील झाडीत लपवला. मात्र, इथंच सर्व बिंग फुटलं आणि घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्याचा छडा लावला. यात, गुन्ह्यात मदत केल्या प्रकरणी पती मिलिंदला देखील अटक करण्यात आली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post