म्युकोरमायकॉसिस आजाराच्या 102 रूग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू


म्युकोरमायकॉसिस आजाराच्या 102 रूग्णांची नोंद, दोघांचा मृत्यूनगर:  जिल्ह्यात आतापर्यंत म्युकोरमायकॉसिस आजाराच्या 102 रूग्णांची नोंद झाली आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी कर्जत तालुक्यात एकाचा मृत्यू झाला होता. तर आता नगरजवळच्या बोल्हेगावातील एकाचा या आजाराने बळी घेतला आहे. सर्व म्युकोरमायकॉसिस रूग्णांवर शहरातील विविध खाजगी रूग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.

करोना संसर्गापाठोपाठ म्युकोरमायकॉसिस आजाराने नगर जिल्ह्यात डोके वर काढले आहे. करोना रूग्णसंख्या कमी होत असली तरी आता म्युकोरमायकॉसिस आजाराचे रूग्ण वाढत आहे. सुरूवातीला 61 रूग्ण आढळून आले होते. आता ही रूग्णसंख्या 102 वर गेली आहे. नगर शहरातील खाजगी रुग्णालयांकडून महापालिकेने म्युकोरमायकॉसिस आजारावर उपचार घेणार्‍यांची माहिती घेतली जात आहे.


नगर शहरातील बोल्हेगाव भागात राहणार्‍या एका व्यक्तीला या आजाराची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी कर्जत तालुक्यात एकाचा मृत्यू झाला होता. यामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post